ऑक्सिजन निमिर्तीसाठी साखर उद्योगाने पुढाकार घ्यावा - मुख्यमंत्री

उस्मानाबाद जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन
ऑक्सिजन निमिर्तीसाठी साखर उद्योगाने पुढाकार घ्यावा - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई -

महाराष्ट्राला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करीत आहोत. त्यासाठी साखर उद्योगानेही ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रांत पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उदघाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाविरुद्धचा पहिला लढा तर आपण जिंकला आहे. पहिल्या लाटेत आपण मोठ्या प्रमाणावर टेस्टींग लँब उभारल्या. कोविड केअर सेंटर उभारले, बेडची क्षमता वाढवली. पण दुसर्‍या लाटेचे आव्हान मोठे आहे.

मात्र आता राज्याच्या विविध भागातून येणारे अहवाल पाहिले असता आता या लाटेवरही आपण मात करू शकू असा विश्‍वास मला आहे. पण त्यासाठी आपण ऑक्सिजन निर्मितीमध्ये स्वावलंबी व्हायला हवे. आपल्या राज्यात 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होतो. आपली गरज साधारणतः 1700 मेट्रिक टन आहे. पण आपल्याला 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती करायची आहे. तरच आपण ऑक्सिजनबाबत स्वावलंबी होऊ शकतो.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com