सहकारी साखर कारखान्यांच्या सभासद भागाच्या दर्शनी मूल्यामध्ये वाढ करण्यास सहकार विभागाची मंजुरी

सहकारी साखर कारखान्यांच्या सभासद भागाच्या दर्शनी मूल्यामध्ये वाढ करण्यास सहकार विभागाची मंजुरी
साखर कारखाना

नेवासा lतालुका प्रतिनिधीl Newasa

राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांच्या भागाची दर्शनी किंमत 10 हजार रुपयांवरुन 15 हजार रुपये करण्यासाठी मंजुरी देणारा आदेश महाराष्ट्र शासनाच्या सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाने हे आदेश निर्गमित केला असून सदर निर्णय 18 मे 2021 पासून लागू असणार आहे.

सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने याबाबद दि.18 मे 2021 रोजी जारी केलेल्या आदेशात म्हंटले आहे की, ज्याअर्थी केंद्र शासनाने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती क्षमतेमध्ये आणि पुरवठ्यामध्ये वाढ करण्यासाठी वेगवेगळया उपाययोजना राबविलेल्या आहेत . तसेच केंद्र शासनाचे पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याचे प्रमाण 5 % वरून 20 % पर्यंत वाढविण्याचे धोरण आहे .केंद्र शासनाने इथेनॉल निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्रातील 126 साखर कारखान्यांच्या आसवणी प्रकल्पांना व्याज अनुदान देण्यास मंजुरी दिलेली आहे. सदर साखर कारखान्यांपैकी 67 सहकारी साखर कारखाने आहेत.

सदयस्थितीत सहकारी साखर कारखान्यांना विस्तारवाढ करण्यासाठी आणि उपपदार्थावरील प्रकिया करणा -या प्रकल्पांच्या उभारणीसाठी वित्तीय संस्थांकडुन कर्ज घेणे आवश्यक झालेले आहे. सहकारी साखर कारखान्यांची वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारण्याची क्षमता क्षीण झालेली आहे आणि काही सहकारी साखर कारखान्यांचे नक्तमूल्य व एन.डी.आर. उणे असल्यामुळे वित्तीय संस्थाकडुन कर्ज प्राप्त होण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

केंद्र शासनाच्या इथेनॉल निर्मिती धोरणाप्रमाणे अमलबजावणी करण्यासाठी नवीन आसवणी प्रकल्प, कार्यरत आसवणी प्रकल्पामध्ये क्षमतावाढ,शून्य प्रदूषण पातळी राखण्यासाठी इन्सीरनेशन बॉयलर उभारणी करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सहकारी साखर कारखान्यांना स्वनिधीची गुंतवणूक कमी पडत आहे . सहकारी साखर कारखान्यांना आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी भागभांडवलामध्ये वाढ करणे आवश्यक आहे आणि भागभांडवलामध्ये वाढ झाल्याने स्वनिधीमध्ये वाढ होवुन नवीन प्रकल्प उभारताना , कार्यरत प्रकल्पामध्ये क्षमता वाढ करताना, गाळप क्षमता वाढ करताना वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे शक्य होणार आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 79 अ खाली प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांच्या भागाची दर्शनी किंमत 10 हजार रुपये वरून 15 हजार रुपये करावी, सर्व सहकारी साखर कारखान्यांनी उपविधिमध्ये दुरुस्ती करुन भागांची दर्शनी किंमत 10 हजारावरून 15 हजार करावी आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश निर्गमित केल्याच्या तारखेपासून म्हणजेच 18 मे 2021 पासून अमलात येतील.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com