औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची अचानक बदली
महाराष्ट्र

औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची अचानक बदली

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

औरंगाबाद - Aurangabad - प्रतिनिधी :

कोरोना संसर्गकाळात अचानकपणे औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीचे आदेश धडकले. सोमवारी सायंकाळी उदय चौधरी यांची बदली मंत्रालयात उपसचिव पदावर करण्यात आली.

2010 आयएएस असलेले उदय चौधरी मूळचे जळगाव येथील असून 2018 मध्ये सिंधुदुर्ग येथून त्यांना औरंगाबादच्या जिल्हाधिकारी पदाची धुरा देण्यात आली होती. अवघ्या 2 वर्षात आणि त्यातल्या त्यात कोरोना संसर्गकाळात त्यांना बदलण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com