दोन महिन्याच्या बाळाच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया

जे.जे. रुग्णालयाच्या डॉ. कल्याण मुंडे यांचा सत्कार
दोन महिन्याच्या बाळाच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

दोन महिन्याच्या बाळाच्या Two Months old Baby ह्रदयाला असलेल्या छिद्रावर यशस्वी शस्त्रक्रिया Successful surgery on Heart करुन या लहानग्याला जीवनदान देणाऱ्या जे. जे. रुग्णालयाच्या कॉर्डिओलॉजी विभागाचे J. J. Hospital the department of the cardiology प्रमुख डॉ. कल्याण मुंडे Dr. Kalyan Munde यांचा बुधवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख Medical Education Minister Amit Deshmukh यांनी मंत्रालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

कर्नाटकच्या गुलबर्गा Karnataka- Gulbarga येथील रहिवाशी आणि मुंबईत रोजगारासाठी आलेल्या राहुल राठोड यांच्या दोन महिन्याच्या लहान मुलाला श्वास घेण्यास त्रास आणि पुरेशी झोप येत नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी गुलबर्गा येथील रुग्णालयात या बाळाच्या चाचण्या केल्या. त्यावेळी बाळाच्या हृदयाला ६ मि.मि. आकाराचे छिद्र असल्याचे निदर्शनास आले.

काही डॉक्टरांशी संपर्क केल्यानंतर हृदयाचा आकार लहान असल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यास अडचण असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर राठोड यांनी जे. जे. रुग्णालयात जाऊन डॉ. मुंडे यांच्याशी संपर्क साधला. खुली शस्त्रक्रिया न करता त्यांनी ट्रान्सकॅथेटर प्रक्रिया राबवून ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून बाळाचा आहार आणि झोप व्यवस्थित होत असल्याचे दिसून आले आहे.

डॉ. कल्याण मुंडे यांनी अवघड शस्त्रकिया यशस्वी करुन बाळाला नवजीवन दिल्याबद्दल अमित देशमुख यांनी आज डॉ. मुंडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, उपसचिव प्रकाश सुरवसे, पत्रकार अमेय तिरोडकर, मंगेश चिवटे, दीपक कैतके आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com