
पुणे | Pune
आज राज्यभर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. त्या अनुषंगाने पुण्यातील अलका टॉकीज चौकात विध्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावेळी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून पुण्याच्या जवळच्या गावातील विद्यार्थीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीची रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यापुढच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनं होणार आहे. ही नवी परीक्षा पद्धती २०२३ पासून म्हणजे याच वर्षीपासून लागू करण्यात येणार आहे. असं करण्यास विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा. या मागणीसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात येत आहे.
मागील दोन वर्षांपासून आम्ही परीक्षेची तयारी करत आहोत. आता नव्या पद्धतीनं परीक्षा द्यायची असेल तर त्यासाठी पुन्हा दोन वर्षे तयारी करावी लागेल. हा आमच्यावर अन्याय आहे, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. दोन वर्षे दिल्यास नव्या पद्धतीनं अभ्यास करणाऱ्यांनी पुरेसा वेळ मिळेल, असंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
तसंच आंदोलन केलं तर विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करू अशी भूमिका घेणारं ट्विट MPSC नं केलं आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे हे मान्य केलं जाणार नाही असंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तसंच MPSC विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेत माही असंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.