महाराष्ट्र

बंधारे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.समीर सतीष  गावित असे मयत विद्यार्थ्यांचे नाव असून तो पारकोटी येथील मुळचा रहिवासी आहे.

आज सकाळी सतीष हा डोक्यावर पडल्यानंतर त्याला उपचारार्थ नवापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर त्याला मृत घोषीत करण्यात आले. यानंतर संतप्त पालक  विद्यार्थ्यांच्या मृतदेहासह आश्रमशाळेत दाखल झाले.

शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यु झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. प्रशासनाच्या समजुतीनंतर विद्यार्थ्याचा मृतदेह त्याच्या गावी रवाना करण्यात आला. बंधारे शासकीय आश्रमशाळेत अद्यापही तणावाचे वातावरण आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com