...तर राज्यातील धार्मिक स्थळे होणार पुन्हा बंद; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचा इशारा

...तर राज्यातील धार्मिक स्थळे होणार पुन्हा बंद; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचा इशारा
डॉ भारती पवार

तुळजापूर | Tuljapur

करोनासह (Corona) ओमायक्रॉनच्या (Omicron) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढत आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवण्यात आली आहेत. तसेच महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढल्यास मंदिरे पुन्हा बंद (Temples closed again) केली जाऊ शकतात, असे सूचक विधान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्‍याण राज्‍यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी तुळजापुर येथे केले.

तुळजापूरमध्ये कुलस्वामीनी आई तुळजाभवानीचे दर्शन डॉ. भारती पवार यांनी घेतले. दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी त्या म्हणाल्या की, करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मंदिरे पुन्हा बंद केली जाऊ शकतात. ओमायक्रॉनसह मूळ करोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मत्रालयाने महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवण्यात आली आहेत.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेला निर्णयप्रक्रियेतील गोंधळ टाळण्यासाठी ओमायक्रॉनच्या नियंत्रणाची जबाबदारी केंद्राने राज्यांवर सोपवल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याआधीच सूचित करण्यात आले आहे.

दरम्यान, केरळ, महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाबमध्ये केंद्रीय पथके पाठवण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com