पेपरफुटीमागे न्यासाच : पोलीस आयुक्त

पेपरफुटीमागे न्यासाच : पोलीस आयुक्त

आतापर्यंत २८ जणांना अटक, सहा कोटींचा मुद्देमाल जप्त

पुणे | Pune

पुणे पोलिसांनी (Pune Police) आतापर्यंत झालेल्या विविध पाच पेपरफुटी प्रकरणात (Paper Leak Case) २८ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत सहा कोटींच्या मुद्देमालासह इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे...

पोलीस आयुक्त म्हणाले की, पाच पेपरफुटी प्रकरणात २८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जवळपास सहा कोटींचा मुद्देमाल आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. २४ तारखेला झालेल्या आरोग्य विभागाच्या ‘गट क’ चा पेपरफुटीत न्यासा कंपनीच्या (Nyasa Company) अधिकाऱ्यांचादेखील समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.

गट ड’चा पेपर न्यासाचे अधिकारी, बोटले आणि बडगिरे अशा दोन माध्यमातून फुटला. दोघे एकमेकांशी संबंधित होते का याचा तपास सुरू आहे. ‘गट क’चा पेपर फोडण्यात न्यासाच्या अधिकाऱ्यांसोबत सहभागी असलेल्या दोन दलालांना अटक करण्यात आली आहे.

एका पेपरसाठी हे दलाल पाच ते आठ लाख रुपये घेत असल्याची माहिती मिळाली. न्यासा कंपनीचे वरिष्ठ अधिकारीदेखील यात समाविष्ट आहेत. न्यासाच्या अधिकाऱ्यांनी पेपर प्रिंट करतानाचा तो फोडला, अशीदेखील माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

Related Stories

No stories found.