भाजपवाले 'दूध के धुले' आणि आम्ही सर्व वाईट; पेडणेकरांचा टोला

भाजपवाले 'दूध के धुले' आणि आम्ही सर्व वाईट; पेडणेकरांचा टोला

मुंबई | Mumbai

यशवंत जाधव (Yashwant Jadhav) आयकर विभागाला (Income Tax) योग्य ते सहकार्य करतील. ते आयटीला उत्तरे देण्यास समर्थ आहेत. वातावरण बिघडवू नका, मुंबई महाराष्ट्र अस्थिर करण्याचे काम सध्या सुरू असल्याची टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केली आहे...

किशोरी पेडणेकर यांनी यशवंत जाधव यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांकडून काहीही अनूचित घडू नये, यासाठी त्यांनी उपस्थिती लावल्याचे सांगितले आहे.

भाजपवाले 'दूध के धुले' आणि आम्ही सर्व वाईट; पेडणेकरांचा टोला
Blog : धगधगते युक्रेन! काय आहेत रशिया-युक्रेन वादाची कारणे?; जाणून घ्या

त्या पुढे म्हणाल्या की, आयकर विभागाला ज्या कागदपत्रांची माहिती हवी आहे ती माहिती यशवंत जाधव देतील. आयकर विभागाच्या छाप्यादरम्यान, जाधव अधिकाऱ्यांना योग्य ते सहकार्य करतील. जाधव भीमपुत्र आहेत ते घाबरणारे नाहीत. शिवसैनिक कुठेतरी चुकीचा वागू शकतो अनुचित प्रकार नको म्हणून मी येथे आले.

भाजपवाले 'दूध के धुले' आणि आम्ही सर्व वाईट; पेडणेकरांचा टोला
किरीट सोमय्यांचे आता उद्धव ठाकरे, सोनिया गांधींवर आरोप

आज ज्यापद्धतीने यंत्रणेचा वापर सुरू आहे. भाजपची (BJP) सत्ता नाही तिथे सर्वांना त्रास होत आहे. म्हणून आम्ही घाबरून बसणार नाही. भाजपवाले फक्त सगळे दूध के धुले आणि शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच (Congress) वाईट असे आहेत, असे वातावरण तयार केले जात असल्याचा टोला, टोला पेडणेकर यांनी लगावला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com