एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत परिवहन मंत्र्यांचे महत्त्वपूर्ण विधान

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत परिवहन मंत्र्यांचे महत्त्वपूर्ण विधान

मुंबई | Mumbai

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Workers) आंदोलन (Agitation) गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी पुन्हा एकदा संप मागे घेण्याची विनंती केली आहे...

वेतनवाढ वगळली तर इतर सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. चर्चा करण्यास तयार आहोत. लोकांची गैरसोय होणे योग्य नाही संप मागे घ्या. असे विधान परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना केले.

माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सविस्तर म्हणणे मांडले मात्र त्यांनी बाहेर जाऊन वेगळेच सांगितले. माझ्या चर्चेची दारे खुली असून इतरांच्या मनात काय हे माहित नाही. अशा शःब्दात परब यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला.

एसटी (ST) विलिनीकरण हे दोन-चार दिवसांत शक्य नाही, त्यासाठी अभ्यास करावा लागेल. पण आपण कर्मचाऱ्यांशी चर्चेसाठी तयार आहोत, असेही परब यांनी स्पष्ट केले.

मी वारंवार आवाहन करत आहे की, नागरिकांची गैरसोय होत आहे त्यामुळे संप मागे घ्या. तुमच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत. विलिनीकरणाचा निर्णय दोन-चार दिवसांत घेण्यासारखा नाही.

त्यामुळे आपण चर्चा करु आणि एकत्र यातून मार्ग काढू. मी विरोधी पक्षनेत्यांशी चर्चेलाही तयार आहे. पण त्यांच्या मनात काय आहे हे माहित नाही. हे आंदोलन जितके चिघळेल तितके आर्थिक नुकसान एसटीचे होईल. परिणामी एसटी कर्मचाऱ्यांचेदेखील यात नुकसान नुकसान होणार आहे, असे परब म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com