वर्षाच्या सुरुवातीलाच धोका; वडेट्टीवार यांचा गंभीर इशारा

वर्षाच्या सुरुवातीलाच धोका; वडेट्टीवार यांचा गंभीर इशारा

मुंबई | Mumbai

राज्यात करोना (Corona) विषाणूवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. तसेच लोकांनी सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय (Lockdown) दुसरा पर्याय दिसत नाही, असा इशारा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी दिला आहे...

वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रात (Maharashtra) जानेवारी आणि एप्रिलमध्ये करोनाची विस्फोटक परिस्थिती निर्माण होऊ शकते. करोना अत्यंत वेगाने पसरत आहे. करोनावर नियंत्रण मिळवणे लोकांच्या हातात आहे.

आपण कसे राहायचे, काय नियम पाळावे, काय नियम पाळू नये हे लोकांनी ठरवायचे आहे. लोकांनी जर सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.

मागच्या वेळेस रेल्वे, विद्यार्थी किंवा इतर जे काही निर्बंध लावले होते. त्या सर्व गोष्टींचा विचार करता आता लॉकडाऊनची स्थिती येते आहे. हा लॉकडाऊन कधी करायचा हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) घेतील, असेदेखील वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.