महाराष्ट्रातील खासगी डॉक्टरांचे उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन

आयएमए आक्रमक
महाराष्ट्रातील खासगी डॉक्टरांचे उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन

मुंबई | Mumbai -

सरकार-पालिका डॉक्टरांसारखे महाराष्ट्रातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) खासगी डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. राज्य सरकारकडून

कधी खासगी रुग्णालयाचा दर ठरवला जातो, तर कधी रुग्णालयावर कारवाई केली जातेय. सरकारच्या या कारभाराविरोधात आयएमए आता आक्रमक झाली असून उद्यापासून (9 सप्टेंबर) आयएमएच्या नेतृत्वाखाली खासगी डॉक्टर राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत.

आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, उद्या कोरोनामुळे मृत्यू झालेल्या राज्यातील आयएमए डॉक्टरांना श्रद्धांजली वाहत आंदोलनाला सुरुवात होणार आहे. तर 10 सप्टेंबरला मुंबईसह राज्यातील विविध सरकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. एका कोरोना रुग्णासाठी मोठा खर्च येत असताना सरकारकडून अन्यायकारक दर खासगी रुग्णालयांसाठी निश्चित करण्यात आले आहेत. हे दर निश्चित करताना डॉक्टरांच्या प्रतिनिधींशी वा आयएमएशी चर्चा न करता सरकार परस्पर दर ठरवत आहे. तर या अन्यायकारक दराविषयी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला तर तो दिला जात नाही, असा आरोप भोंडवे यांनी केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com