मुंबई-पुणे प्रवास आता फक्त अडीच तासात होणार, कारण...

मुंबई-पुणे प्रवास आता फक्त अडीच तासात होणार, कारण...

मुंबई | Mumbai

आता मुंबई पुणे-प्रवास अधिक सुखकारक होणार असून या रेल्वे प्रवाशांचा एक तास वाचणार आहे. कारण राज्याला पहिली 'वंदे भारत ट्रेन' (vande bharat express train) मिळणार आहे. यामुळे मुंबई-पुणे (Mumbai-pune)प्रवास फक्त अडीच तासात होणार आहे.

राज्याला येत्या १५ ऑगस्टपर्यंत २ गाड्या वंदे भारत रेल्वे मिळणार आहे. ही रेल्वे १६० किमीच्या वेगाने धावणार आहे. सध्या प्रवासासाठी उपलब्ध असलेल्या ट्रेनमधून (Train)प्रवास केला तर आपल्याला मुंबई-पुणे प्रवासासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. परंतु वंदे भारत ट्रेनमुळे हा प्रवास अडीच तासावर येणार असल्याने प्रवाशांचा एक तास वाचणार आहे.

दरम्यान या वंदे भारत ट्रेनमध्ये सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. धोक्याच्या स्थितीत ट्रेन सिग्नल ओलांडल्याच्या घटना टाळण्यासाठी कोलिशन अवॉयडन्स सिस्टम प्रणाली वापरण्यात येणार आहे. ट्रेनमध्ये एक अतिरिक्त सेंट्रलाइज्ड मॉनिटरिंग कोच देखील दिला जाईल, ज्यामधून सर्व इलेक्ट्रिकल घटक आणि हवामान नियंत्रणावर लक्ष ठेवले जाईल.

जुन्या गाड्यांच्या तुलनेत, नवीन गाड्या अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांसह अपग्रेड केल्या गेल्या आहेत, ज्यात डब्यांमध्ये फायर डिटेक्शन अलार्म, रूम आणि टॉयलेटमध्ये फायर डिटेक्शन सिस्टम, आपत्ती दिवे, आपत्कालीन दिवे यांचा समावेश आहे. प्रत्येक कोचमध्ये चार आपत्कालीन खिडक्यांचा समावेश आहे. याशिवाय आपत्कालीन पुश बटण आणि टॉक-बॅक सिस्टीम देण्यात आली आहे, ज्याद्वारे लोको पायलटशी बोलता येईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com