
मुंबई | Mumbai
भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पत्रकार परिषद घेताना उर्फी जावेदवरून (urfi javed) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता राज्य महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे...
रुपाली चाकणकर यांनी म्हंटले आहे की, उर्फी जावेदला पत्र देत नाही. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आयोग करत असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली. पण स्वत:च्या प्रसिद्धीसाठी आणि आकसापोटी आयोगावर जी भूमिका घेतली आहे या प्रकरणी आम्ही चित्रा वाघ यांना नोटीस पाठवत आहोत. मेलद्वारे ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
महिलेच्या पेहरावाबाबत बोलताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाबाबत अप्रतिष्ठा होईल, असे वक्तव्य केले. राज्य महिला आयोगाच्या नोटीसीचा चुकीचा अर्थ काढून आयोगाबाबत समाजात अविश्वास निर्माण होईल, असे वर्तन केले. दोन महिलांच्या विभिन्न प्रकरणांची हेतुपुरस्कर तुलना करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले. त्यामुळे या प्रकरणी दोन दिवसात खुलासा सादर करावा. अन्यथा तुमचे काही म्हणणे नाही असे समजून आयोगाकडून कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य महिला आयोगाकडून अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.