राज्यातील 142 कारखान्यांकडून 123 लाख टन ऊसाचे गाळप पूर्ण

साखर कारखाना
साखर कारखाना

नेवासा l सुखदेव फुलारी l Newasa

यंदाचे सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात राज्यातील 142 साखर कारखान्यांनी 22 नोव्हेंबर 2020 अखेर 123.19 लाख मेट्रिक टन

ऊसाचे गाळप करून 102.31लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे.राज्याचा सरासरी साखर उतारा 8.31टक्के आहे.

यावर्षी राज्यतील साखर कारखान्याना 15 ऑक्टोबर पासून गळीत हंगाम सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली.मात्र अवकाळी पावसाने ऊस शेतात साचलेले पाणी आणि ऊस तोड कामगारांचा संप यामुळे प्रत्यक्ष ऊस गाळप 10 दिवसांनी लांबणीवर जाऊन 25 ऑक्टोबर पासून गळीत सुरू झाले.

दि.22 नोव्हेंबर अखेर राज्यातील 73 सहकारी व 69 खाजगी अशा एकूण 142 साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत.

22 नोव्हेंबर 2020 अखेर राज्यात विभाग निहाय झालेले ऊस गाळप,साखर उत्पादन,साखर उतारा खालील प्रमाणे--

विभाग || गाळप लाख मे. टन || साखर उत्पादन लाख क्विंटल || साखर उतारा टक्के ||हंगाम सुरू कारखान्यांची संख्या

कोल्हापूर विभाग - 25.03 23.74 9.48 टक्के 31

पुणे विभाग - 30.37 27.53 9.06 टक्के 24

अ.नगर विभाग - 22.03 17.1 7.76 टक्के 24

सोलापूर विभाग- 25.89 20.15 7.78 टक्के 20

औरंगाबाद विभाग- 12.25 8.42 6.87 टक्के 19

नांदेड विभाग - 6.51 4.58 7.04 टक्के 14

अमरावती विभाग - 1.11 0.79 7.12 टक्के 02

नागपूर विभाग - टक्के 00

--------------------------------------------------------------------

एकूण - 123.19 102.31 8.31 टक्के 142

(नागपूर विभागातील एक ही साखर कारखान्याचा गळीत हंगाम अद्याप ही सुरू झालेला नाही)


नगर जिल्ह्यातील 21 कारखान्यांकडून लाख मेट्रिक टन उसाचे गाळप...

नगर जिल्ह्यातील एकूण 21 साखर कारखान्यांनी 22 नोव्हेंबर 2020 अखेर 25 लाख 89 हजार 381.68 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 20 लाख 15 हजार 99 क्विंटल साखर निर्मिती केली आहे.जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 07.78 टक्के आहे.

नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 22 नोव्हेंबर अखेर केलेले ऊस गाळप, साखर उत्पादन व सरासरी साखर उतारा पुढील प्रमाणे--

अ.नं. कारखाना ऊस गाळप मे. टन सा. उत्पादन क्विंटल सरासरी टक्के

1) ज्ञानेश्वर 198355 163350 8.24 टक्के

2) मुळा 150560 121700 8.08 टक्के

3) संजीवनी 86529.02 55100 6.37 टक्के

4) कोपरगाव 83760.71 68300 8.15 टक्के

5) अशोक 82960 48600 5.86 टक्के

6) कुकडी 107800 89650 8.32 टक्के

7) संगमनेर 205290 169090 8.24 टक्के

8) अंबालिका 292680 233850 7.99 टक्के

9) गंगामाई 187670 130200 6.94 टक्के

10) वृद्धेश्वर 60390 46250 7.66 टक्के

11) अगस्ती 109657.96 90050 8.21 टक्के

12) केदारेश्वर 62520 39150 6.26 टक्के

13) क्रांती शुगर (पारनेर) 25655 20900 8.15 टक्के

14) साई कृपा नं 1 71980 65250 9.07 टक्के

15) प्रसाद शुगर 70190 57350 8.17 टक्के

16) गणेश 19700 11475 5.82 टक्के

17) प्रवरा 60800 40150 6.6 टक्के

18) श्रीगोंदा 109172 97200 8.9 टक्के

19) पियुष-नगर 7015 900 1.28 टक्के

20) जय श्रीराम 39405 28830 7.32 टक्के

21) युटेक 23555 12500 5.31 टक्के

-----------------------------------------------------------------------------------------------------------

एकूण 2055644.69 1589845 7.73 टक्के

जिल्ह्यातील साई कृपा नंबर 2 चा हंगाम बंदच आहे तर राहुरी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ झालेला असला तरी अद्याप प्रत्यक्ष ऊस गाळप व साखर उत्पादन सुरू झालेले नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com