
मुंबई | Mumbai
उस्मानाबाद (Osmanabad) येथील उरुसात चेंगराचेंगरी (stampede) झाल्याची माहिती मिळत आहे. या चेंगराचेंगरीत १४ भाविक जखमी झाल्याचे समजते. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे...
उरुसात वळू उधळल्याने गोंधळ माजला होता त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. उस्मानाबाद शहरातील 'हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहे' या उरुसात पहाटे तीन वाजता ही दुर्घटना घडली आहे. या उरुसात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
यातच एक वळू घुसला आणि तो उधळला. त्यामुळे उरुसात एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले. यामुळे चेंगराचेंगरी होऊन १४ भाविक जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.