...तेव्हाच राज ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांना देणार पाठींबा

...तेव्हाच राज ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांना देणार पाठींबा
राज ठाकरे

मुंबई | Mumbai

एसटी संपाच्या (ST Strike) पार्श्वभूमीवर आज एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसमोर एक अट ठेवली...

यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडतानाच केवळ राज ठाकरेच हा प्रश्न सोडवू शकतात असे म्हणून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्याने ‘ना काम, ना दाम’ यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब (Anil Parab) यांनी दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुढाकार घेत संप मागे घेण्याचे आवाहन निवेदनाद्वारे केले आहे. मात्र या साऱ्या गोंधळादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका प्रतिनिधी मंडळाने आज राज यांची भेट घेतली आहे.

भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी चिंता व्यक्ती केली. ते म्हणाले की, मी आत्महत्या करणाऱ्यांचे नेतृत्व करत नाही. आधी आत्महत्या थांबवा ही माझी अट असेल.

संपाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरकारशी संवाद साधणार आहे. सरकारसोबत माझे बोलणे झाले तर त्यापुढे करायचे हे कर्मचाऱ्यांना सांगेन. आत्महत्या करू नका, आत्महत्या हा उपाय नाही. डाव अर्धवट सोडून जायचं नाही. मनसे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, असे आश्वासन राज ठाकरेंनी शिष्टमंडळाला दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com