एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार; मुंबई महापालिकेसमोर बोंबाबोंब

एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार; मुंबई महापालिकेसमोर बोंबाबोंब

मुंबई | Mumbai

एसटी कर्मचारी (ST Workers) विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम असून त्यांनी आंदोलन (Agitation) सुरुच ठेवले आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) एसटी विलिनीकरणाबाबत प्रकरण प्रलंबित आहे. राज्य सरकारने (State Government) एसटी विलिनीकरण होणार नाही, अशी भूमिका घेतली....

आज एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत एसटी कर्मचाऱ्यांनी मुलभूत सोयी सुविधांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) आणि मुंबई महापालिकेसमोर (BMC) आंदोलन सुरु केले आहे.

पोलिसांनी (Police) एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानात (Azad Maidan) जाण्याची विनंती केली आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन (Agitation) सुरु केले आहे. या आंदोलनामुळे पोलिसांनी अतिरिक्त बळ मागवले असून एसटी कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.

तसेच मुंबईच्या सीएसएमटी (CSMT) स्टेशन बाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी टॉयलेट आंदोलन सुरु केले आहे. मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आझाद मैदानात शौचाची आणि अंघोळीची सोय नसल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहे. कर्मचाऱ्यांनी शौचास जायचे कुठे? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला (State Government) विचारला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com