एसटी कर्मचाऱ्यांबाबत मोठी घोषणा होणार? अनिल परब यांची सायंकाळी पत्रकार परिषद

एसटी कर्मचाऱ्यांबाबत मोठी घोषणा होणार? अनिल परब यांची सायंकाळी पत्रकार परिषद

मुंबई l Mumbai

राज्यात गेले काही दिवस सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता मिटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (MSRTC Strike) तोडगा निघण्याची शक्यता आहे.

एसटी कर्मचाऱ्यांबाबत मोठी घोषणा होणार? अनिल परब यांची सायंकाळी पत्रकार परिषद
लालपरी मार्गावर : कर्मचाऱ्यांचा मुळ पगारात वाढ, विलिकरणाचा निर्णय समितीच्या अहवालानंतर

संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे एक शिष्टमंडळ आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यात आज एक बैठक पार पडली. जवळपास साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत शिष्टमंडळासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

परिवहन मंत्री अनिल परब आज संध्याकाळी ६ वाजता पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे संध्याकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com