दहावी निकालाची वेबसाईट पुन्हा हँग

विद्यार्थी आणि पालकही वैतागले
दहावी निकालाची वेबसाईट पुन्हा हँग

मुंबई / Mumbai - दहावी निकालाची हँग झालेली वेबसाईट चार तासानंतर सायंकाळी 5.45 ते 6.15 वाजेदरम्यान सुरु झाली होती. http://result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर काही विद्यार्थ्यांना निकालही पाहता आला. मात्र काही वेळानंतर वेबसाईट पुन्हा बंद झाली आहे. त्यामुळे निकाल जाहीर होऊनही तो पाहता येत नसल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालकही वैतागले आहेत.

करोनामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. दुपारी 1 वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार होता. मात्र निकालाची वेबसाइट हँग झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या.

साधारणतः 16 लाख विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. या निकालाची उत्सुकता असताना अचानक वेबसाईट्सचे यूजर वाढल्यानं वेबसाईट हँग झाली होती. अखेर पाच तासानंतर सुरु झालेली वेबसाईट पुन्हा बंद झाली असून वेबसाईट कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com