मुंबई / Mumbai - करोनामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे आज निकाल जाहीर करण्यात आला आहे.
दुपारी 1 वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार होता. मात्र निकालाची वेबसाइट हँग झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. साधारणतः 16 लाख विद्यार्थी या परिक्षेला बसले होते.
या निकालाची उत्सुकता असताना अचानक वेबसाईट्सचे यूजर वाढल्यानं वेबसाईट हँग झाली होती. मात्र आता चार तासानंतर वेबसाईट पुन्हा सुरु झाली असून विद्यार्थ्यांना निकाला पाहता येणार आहे.
http://result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.