दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, 'या' तारखांना निकाल जाहीर होण्याची शक्यता

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, 'या' तारखांना निकाल जाहीर होण्याची शक्यता

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांचं यंदाचं शिक्षण ऑनलाईन झालं मात्र परीक्षा ऑफलाईन (Offline exam) पद्धतीनं घेण्यात आल्या. आता विद्यार्थ्यांना निकालाची (SSC HSC result date) प्रतीक्षा आहे. अशात आता निकालाबाबतची महत्वाची बातमी हाती आली आहे. (Maharashtra state Board Exam Result)

एसएससी बोर्डाकडून (SSC Board) दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. दहावीचा निकाल २० जूनपर्यंत तर बारावीचा निकाल १० जूनला लागणार असल्याची माहिती एसएससी बोर्डाकडून आज देण्यात आली आहे. (SSC result date)

शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावत होती. परंतु जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. (HSC Result date)

Related Stories

No stories found.