
पुणे | प्रतिनिधि
कॉपी बहाद्दरांना आळा घालण्यासाठी आता त्यांच्यावर वॉच ठेवण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. यासाठी परीक्षेदरम्यानची व्यवस्था सक्षम करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
यंदा ऑनलाईन परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे व्हिडीओ व ऑडिओ रेकॉर्डिंगही केले जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार करताना आढळल्यास त्याच्यावर कडक करावाई केली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.
करोना काळात सुरु झालेल्या ऑनलाईन परीक्षा पद्धती सुरु झाली. मात्र या परीक्षा पद्धतीचा गैरफायदा घेत कॉपी बहाद्दरांचे स्तोम माजले आहे.त्यामुळे विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.
येत्या १५ फेब्रुवारीपासून विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. या परीक्षांमध्ये बहुपर्यायी (एमसीक्यू) पद्धतीच्या असणार आहेत. गतवर्षी झालेल्या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर विद्यापीठाने प्रॉक्टर्ड पद्धतीने परीक्षा घ्यायला सुरुवात केली.
यंदा त्यात आणखी कडक नियम लागू करण्यात येणार असून परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे. एखादा विद्यार्थी परीक्षा देताना बोलताना आढळल्यास तसेच स्क्रीन सोडून बाहेर जात असतील तर त्यांना परीक्षेतून बाद करण्यात येणार आहे.
परीक्षा अधिक पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात ही प्रक्रिया राबवली जाणारा असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले.
प्रॉक्टर्ड पद्धतीने परीक्षा घेण्याचा अनुभव विभागांना आहे. त्यामुळे विद्यार्थी नेमके कश्या प्रकारे गैरप्रकार करू शकतात याची माहिती तसेच अंदाजही विभागांना आहे. परीक्षेच्या दरम्यान याचा गोष्टींवर लक्ष ठेवले जाणारा आहे. त्यामुळे कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलाच चाप बसणार आहे.