मध्य रेल्वेकडून 'या' विशेष ट्रेन १० मे पर्यंत बंद

मध्य रेल्वेकडून 'या' विशेष ट्रेन १० मे पर्यंत बंद

मुंबई | Mumbai

राज्यात वाढत्या करोना रूग्णसंख्येला रोखण्यासाठी सरकारकडून 'ब्रेक द चेन' अंतर्गत नियमावली कडक करण्यात आली आहे.

संचारबंदी असल्याने अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडण्यावर बंदी आहे. त्यामुळे ऐन उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात लोकांना घरातच बसून सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अनेकजण हा सल्ला पाळत असल्याने आता लांब पल्ल्यांच्या अनेक रेल्वे ट्रेन मध्येही प्रवासीसंख्या रोडावली आहे.

त्यामुळेच आता मध्य रेल्वेने दएखील 10 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते नागपूर, पुणे, लातूर अशा विविध जिल्ह्यांना जोडणार्‍या सुमारे 10 विशेष गाड्या आता 10 मे पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

दरम्यान रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये मुंबई-मनमाड- मुंबई स्पेशल, मुंबई-पुणे-मुंबई स्पेशल, पुणे- नागपूर ट्राय विकली स्पेशल, मुंबई- नागपूर स्पेशल, आठ्वड्यातून 4 वेळेस धावणारी मुंबई- लातूर स्पेशल, मुंबई -सोलापूर स्पेशल,

मुंबई - कोल्हापूर स्पेशल, मुंबई- अमरावती स्पेशल, मुंबई -जालना स्पेशल अशा 10 विविध गाड्यांच्या फेर्‍यांचा समा वेश आहे. या ट्रेन 28 एप्रिल पासून 10 मे पर्यंत बंद ठेवल्या जातील अशी माहिती देण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com