मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

औरंगाबाद शहरातल्या कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर माहिती देताना पवार म्हणाले, ही घटना दुर्दैवी असून सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे.

याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे.