बीड -

करोनामुळे यंदा बीडमधील गाढवावरुन मिरवणुकीची परंपरा खंडित होणण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा येथे दरवर्षी धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावर

बसवून जावयाची मिरवणूक काढण्याची अनोखी प्रथा आहे. या परंपरेला जवळपास 90 हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. करोना संकटामुळे बीडसह अनेक जिल्ह्यात यंदा जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. होळी, धुलिवंदन यासारखे सण साजरे करण्यावरही मर्यादा आहेत. त्यामुळे गदर्भ सवारीची ही प्रथाही खंडित होण्याची शक्यता आहे. गाढवावर बसून मिरवणूक काढण्याची नामुष्की टाळण्यासाठी जावयांना लपून बसण्याची कसरत करावी लागते. मात्र ही परंपरा या वर्षी पाळली जाण्याची शक्यता कमी असल्याने विड्याच्या जावयांना लपून बसण्याची गरज पडणार नाही.

यामध्ये जावयाची मिरवणूक संपूर्ण गावातून वाजत गाजत काढण्यात येते. संपूर्ण गाव या मिरवणुकीत सहभाग घेते. तब्बल पाच तास मिरवणूक चालल्यानंतर मारुतीच्या मंदिराजवळ येऊन या जावयाला नवीन कपड्याचा आहेर दिला जातो. एकदा गाढवावर बसवण्यात आलेल्या जावयाला दुसर्यांदा बसवण्यात येत नाही. एरव्ही सासरच्या मंडळीकडून अपेक्षा करत रुसवा फुगवा करणारे जावई धुलिवंदनाला गपचूप गाढवावर बसतात. धुलिवंदनाच्या मिरवणूकीत गावकर्यांसह ते सुद्धा सहभागी होतात. थट्टेतून जावयाचा सन्मान करणारे विडा हे देशातले एकमेव आहे.

अशी आहे परंपरा

साडेसात हजार लोकसंख्या असलेल्या या विडा गावात 150 घरजावई कायम स्वरुपी वास्तव्यास आहेत. धुलिवंदनाच्या दोन दिवस आधीपासूनच जावईबापूंना शोधण्याची मोहीम गावकरी हाती घेतात. बरेच जावई गावकर्यांपासून वाचण्यासाठी पसार होतात. कोणता जावई कुठे आहे याचा तपास करण्यासाठी गावात पथकंही नेमली जातात. धुलिवंदनाच्या दिवशी त्या जावयाला पकडून गाढवावर बसवण्याची तयारी करण्यात येते.

कपड्याचा आहेर

जावयाची मिरवणूक संपूर्ण गावातून वाजत गाजत काढण्यात येते. संपूर्ण गाव या मिरवणुकीत सहभाग घेते. तब्बल पाच तास मिरवणूक चालल्यानंतर मारुतीच्या मंदिराजवळ येऊन या जावयाला नवे कपडे आहेर म्हणून दिले जातात.