Indian Army
Indian Army
महाराष्ट्र

सैनिकांना ग्रामपंचायत कर माफ

शासन निर्णय निर्गमित

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई |Mumbai - राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. soldiers in Maharashtra exempted from grampanchayat property tax

राज्याचे कृषी आणि माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी या मागणीसंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यांच्या विनंतीस अनुसरुन निर्णय घेण्यात आला. संरक्षण दलातील शौर्य पदकधारक, सेवा पदकधारक यांना तसेच अशा पदकधारकांच्या विधवा किंवा त्यांच्या अवलंबितांना त्यांच्या वापरात असणार्‍या एका निवासी इमारतीस ग्रामपंचायत मालमत्ता करातून माफी देण्याची तरतूद सध्या आहे. आता ही तरतूद व्यापक करुन राज्यातील सर्व आजी, माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com