सोलापूर -

तीन जणांचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्याला अखेर ठार करण्यात वनविभागाला यश आले आहे. वांगी नंबर 4 रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी गोळ्या घालून ठार केले. बिबट्याला ठार करण्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून तब्बल 200 जण मागावर असल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपासून बिबट्याने तालुक्यात दहशत पसरवली होती. या बिबट्यांने आतापर्यंत तिघांचा बळी घेतला होता. धक्कादायक बाब म्हणजे या बिबट्याने दोन व्यक्तींना मारताना त्यांचे मुंडके धडावेगळे केले होते. त्यामुळे शासनाने या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले होते.

दरम्यान, अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे या ऑपरेशनमध्ये सामील झाले होते. वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मात्र, अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी 15 फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर तीन गोळ्या फायर करीत त्याला ठार केले.