मुंबई । Mumbai

करोना काळात नव्या वर्षाचं सर्वत्र उत्साहात स्वागत केलं जात आहे. अनेक ठिकाणी अटी-शर्थींसह नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तसेच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा काव्यमय रित्या दिल्या आहेत.

रामदास आठवले यांनी शुभेच्छा देत म्हंटल आहे की,

"सरते 2020 वर्ष ठरले करोनाच्या भीतीचे

तरीही त्यात दिसले काही लोक हिंमतीचे

करोनायोद्धे हिंमतीने लढले

काही करोनामुळे धारातीर्थीपडले

मी ही दिला गो कोरोनाचा नारा त्या विरुद्ध लढण्यासाठी

जागा झाला भारत सारा करोनाला गाडण्यासाठी

करोनामुळे जात होते कित्येकांचे जीव

लॉकडाऊन मध्ये पंतप्रधान मोदी सरकार ने केली गरिबांची कीव

लॉक डाऊन करून वाचविले जीव

अन्नधान्य वाटून वाचले गरिबांचे जीव

येणाऱ्या वर्षात करोना संपून जावा

सन 2021चा उगवता सूर्य सर्वाना नवजीवन घेऊन यावा!

नव्या वर्षात होऊ नये कुणाचाही करोनाशी सामना !

म्हणून मी देतो सर्वाना नव्या वर्षाच्या शुभकामना !

दरम्यान, रामदास आठवले यांनी देशात करोनाची संख्या झपाट्याने वाढत असताना सुरुवातीला 'गो करोना, करोना गो' अशी घोषणा दिली होती. त्यानंतर आता आता ब्रिटनमध्ये नवा करोना विषाणू आढळून आल्यानंतर रामदास आठवले यांनी नवीन करोना विषाणू विरोधात 'नो करोना, करोना नो,'अशी घोषणा दिली आहे.