‘मी अजित दादांचा पीए बोलतोय’, २० लाख द्या अन्यथा...

‘मी अजित दादांचा पीए बोलतोय’, २० लाख द्या अन्यथा...
अजित पवार

पुणे | Pune

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावे पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डरला २० लाखांची खंडणी (Ransom) मागितल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक (Arrested) करण्यात आली आहे...

किरण रामभाऊ काकडे, चैतन्य राजेंद्र काकडे, आकाश शरद निकाळजे, नवनाथ भाऊसाहेब चोरमले, सौरभ नारायण काकडे आणि सुनिल ऊर्फ बाळा गौतम वाघमारे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत...

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, वाडे बोल्हाई (Wade Bolhai) येथील जागेचा एका वाद सुरू होता. आरोपींनी गुगल प्ले स्टोअरवरून (Google Play Store) फेक कॉल ॲप (Fake Call App) डाऊनलोड करून घेतले. या ॲपवरून अजित पवारांचा मोबाईल नंबर वापरुन आरोपींनी बिल्डरला फोन लावला.

यानंतर मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए बोलत आहे. वाडे बोल्हाई शिरसाटवाडी येथील बाबा भाऊ चोरमले यांच्यासह हेक्टर जमिनीचा वाद मिटवून टाका. बिल्डरला गावात पाय ठेवू देणार नाही आणि तुमचे कोणतेही यापुढे प्रोजेक्ट होऊ देणार नाही, अशी धमकी देऊन २० लाखांची मागणी करण्यात आली.

विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपींना दोन लाख रुपये देण्यात आले होते. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी बिल्डरने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून सहा जणांना अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com