तर माझी मुलगी...; श्रद्धा वालकरच्या वडिलांचा वसई पोलिसांवर गंभीर आरोप

तर माझी मुलगी...; श्रद्धा वालकरच्या वडिलांचा वसई पोलिसांवर गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हिचे वडील विकास वालकर (Vikas Walkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली...

विकास वालकर म्हणाले की, श्रद्धाची हत्या (Murder) झाली असून आम्हाला अत्यंत दु:ख आहे. दिल्ली गव्हर्नर यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. दिल्ली पोलीस (Delhi Police) आणि वसई पोलीस (Vasai Police) यांचे आतापर्यंतच्या तपासाहचे काम संयुक्तपणे व्यवस्थित चालले.

मात्र अगदी सुरूवातीस वसई येथील तुळींज पोलीस स्टेशन यांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे मला बराच त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल चौकशी व्हावी, जर तसे झाले नसते तर, माझी मुलगी आज जिवंत असली असती, असे ते म्हणाले.

आफताब पूनावाला याला कठोर शिक्षा व्हावी, सोबतच आफताबच्या कुटुंबातील सदस्यांची सुद्धा चौकशी केली जावी, तसेच त्यांना सुद्धा शिक्षा द्यावी. या कटात जे कोणी सामील असतील त्याचा तपास करून त्यांना शिक्षा मिळावी, असेदेखील त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com