कुणीतरी माझ्या हत्येचा कट रचतंय; सारेगमप फेम वैशाली भैसनेची धक्कादायक पोस्ट

कुणीतरी माझ्या हत्येचा कट रचतंय; सारेगमप फेम वैशाली भैसनेची धक्कादायक पोस्ट

मुंबई | Mumbai

माझ्या हत्येचा कट रचला जातोय. २ दिवसानंतर पत्रकार परिषद (Press conference) घेऊन मी याचा गौप्यस्फोट करणार आहे. आज मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, अशी पोस्ट सारेगमप फेम गायिका वैशाली भैसने-माडे हिने (Vaishali Bhaisane) केली आहे.

वैशाली भैसनेने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या पोस्टची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. या पोस्टमध्ये काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे, असे तिने म्हटले आहे. तिची पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, वैशालीने काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वैशालीचे स्वागत केले होते. वैशालीला विदर्भाचे विभागीय अध्यक्षपद देण्यात आले आहे.

कोण आहे वैशाली भैसने?

वैशाली भैसने ही हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांमध्ये प्लेबॅक सिंगिग करते. ‘बाजीराव मस्तानी’ (Bajirao Mastani) या चित्रपटातील ‘पिंगा’ (Pinga) हे गाणे तिने गायले आहे.

या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. मराठी चित्रपटातील अनेक गाणी तिने गायली आहेत. वैशाली ही सारेगमप या स्पर्धेची विजेती ठरली होती. वैशाली मराठी बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वात (big boss marathi season 2) स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com