इतका अपयशी मंत्री राज्याने पाहिला...; खासदार संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

इतका अपयशी मंत्री राज्याने पाहिला...; खासदार संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

मुंबई | Mumbai

ड्रग्स माफिया ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) यांच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केला आहे. ललित पाटील हा शिवसेनेचा महानगर प्रमुख कधीच नव्हता. तो महानगर प्रमुख काय? शिवसेनेचा साधा शाखाप्रमुख किंवा गटप्रमुखही नव्हता, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेले सर्व आरोप संजय राऊत यांनी फेटाळून लावले आहे.

संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस खोटं बोला, पण रेटून बोला याला जागून वागत आहेत. कालच पाहिलं की, कुणी तरी एक ड्रग्ज माफिया मुंबईत पकडला आहे आणि चेन्नईत, बंगळुरूत पकडल्याचे सांगत आहेत. हे म्हणतात की, तो शिवसेनेचा नाशिक शहर प्रमुख होता. आम्ही कोण कोण कधी कधी शहर प्रमुख होते त्याची यादी दिली आहे.”

पुढे ते म्हणाले, ज्यांनी ललित पाटीलला पोसले आज तेच लोक तुमच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. किती खोटे बोलत आहात. त्यांच्या खात्यावर कंट्रोल नाही. किंवा गुप्तचर विभाग त्यांना खोटी माहिती देत आहे. इतका अपयशी मंत्री राज्याने पाहिला नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“आता पोलिसांनी निष्पक्षपणे तपास करावा. सध्या मंत्रिमंडळातील जे सर्व पोपट बोलत आहेत ते घाबरून बोलत आहेत. यांना घाम फुटला आहे. म्हणून ते आरोप करत सुटले आहेत,” अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

इतका अपयशी मंत्री राज्याने पाहिला...; खासदार संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
माझे बलिदान वाया जाऊ देऊ नका...; मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी युवकाची विष प्राशन करत आत्महत्या

दादा भुसे म्हणतात की, ललित पाटीलला उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधले. त्याला घेऊन कोण आले होते? हा आपला खास माणूस आहे साहेब. याला शिवसेनेत घ्या. तो भाजपमध्ये जात होता. याला महाराष्ट्रात घेऊन फिरेल, असे दादा भुसे म्हणाले होते, असे सांगतानाच ललित पाटील कोण आहे हे आम्हाला माहीतही नव्हते.

पण अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, भावना गवळी, राहुल शेवाळे, प्रताप सरनाईक यांच्यासह तुम्हाला माहीत असलेले आरोपी तुम्ही पक्षात घेतले. त्यांना मंत्रिमंडळात बसवले. ज्यांना तुरुंगात टाकले पाहिजे ते मंत्रिमंडळात आहेत. अन् तुम्ही आम्हाला सांगताय. या सर्वांचे उत्तर तुम्हाला दसरा मेळाव्यात मिळेल, असेही राऊत म्हणाले.

इतका अपयशी मंत्री राज्याने पाहिला...; खासदार संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
भाजपनं ज्यांना तिकीट नाकारलं, त्यांच्यावर काय बोलणार; शरद पवारांचा बावनकुळेंना खोचक टोला

२०२४च्या परिवर्तनाची सुरवात

महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी जनता या दसरा मेळाव्याला येणार आहे. आता दुसरे कोणी काय करत असतील तर त्याविषयी आम्हाला बोलण्याची गरज नाही. डुप्लिकेट माल हा बाजारात येत असतो. काही काळ राहतो. दिवाळी आली की चिनी पणत्या येतात. चिनी लक्ष्मीच्या मुर्त्या येतात. चिनी फटाके येतात.

त्यामुळे आमचे संपूर्ण लक्ष हे आता दसरा मेळाव्याकडे आहे. या दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जोरदार तयारी सुरू आहे. जनसागर उसळणार आहे आणि २०२४ च्या परिवर्तानाची सुरुवात महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या ही परवाच्या दसरा मेळाव्यातूनच होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com