व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
महाराष्ट्र

व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

उदयनराजे भोसले यांच्या शपथविधीवरून राजकीय वातावरण तापले

Rajendra Patil Pune

पुणे (प्रतिनिधी) | Pune - राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शपथविधीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय. उदयनराजेंनी शपथ घेताना 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली होता. शपथेवेळी या घोषणेला सभापती व्यंकय्या नायडू यांनी विरोध केला होता. त्यामुळे पुण्यात शिवसेनेनं व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच नायडू यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

आज पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी 'जय भवानी जय शिवाजी', अशी घोषणाबाजी करत व्यंकय्या नायडू यांच्याविरोधात नारेबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागितली आणि आता त्यांच्याच वंशजांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. हे निषेधार्ह आहे. अशा माणसांना जनता सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. काल झालेल्या या घटनेचा शिवसैनिकांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये तीव्र रोष असल्याचं शिवसैनिकांनी यावेळी म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com