Shivrajyabhishek Din 2023 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह, हजारो शिवभक्तांची उपस्थिती

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरती, पोलिसांनी दिली मानवंदना
Shivrajyabhishek Din 2023 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह,  हजारो शिवभक्तांची उपस्थिती

मुंबई | Mumbai

छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडत आहे. राज्य सरकारकडून या सोहळ्याची भव्य दिव्य अशी तयारी करण्यात आली आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री व लाखो शिवभक्तांची उपस्थिती आहे.

रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी अवघ्या रायगडावर फुलांची आरास करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी फुलांनी सजवण्यात आले.

महाराजांचा बसलेल्या स्थितीतील चांदीचा पुतळा पालखीसाठी सजवण्यात आली. या पालखी सोहळ्यासाठी अनेक नेतेमंडळी आणि मान्यवर उपस्थित आहेत. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी-जय शिवाजी' असा घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com