
मुंबई | Mumbai
मनसेचे ऐकले तर 2400 मंदिरांनाही तसेच चर्च, गुरुद्वारा, बौद्ध मंदिरांना भोंगे वापरता येणार नाहीत. सार्वजनिक उत्सवांना परवानगी मिळणार नाही. पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत सर्वधर्मीय प्रतिनिधींनी मनसेला निकराचा विरोध केला आहे. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर, शिर्डीची काकड आरती बंद झाली. हे पाप कोणाचे? असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे.
मनसेचा राजकीय स्वार्थापोटीचा अविचार व भाजपाचा अजेंडा पुरोगामी महाराष्ट्राला घातक आहे. भाजपाशासित राज्यांनी बंदी का घातली नाही? सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत आवाजाच्या तीव्रतेवर मर्यादा घालण्यात आलीय. या व्यतिरिक्त कोणतेही बंधन नाही, असं मत सचिन सावंत यांनी व्यक्त केलं. तसेच मनसेच्या या भूमिकेतून मनसेमध्ये किती अज्ञान आहे हे स्पष्ट होते, असा टोला लगावला. सावंत यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली.