
पुणे | Pune
पुण्यातून (Pune) एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. शिंदे गटातील (Shinde Group) निलेश माझिरे (Nilesh Mazire) यांच्या पत्नीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे...
बुधवारी रात्री त्यांनी विष प्राशन केले होते. गुरुवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. कौटुंबिक वादातून आत्महत्या (Suicide) केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे पुण्यात (Pune) एकच खळबळ उडाली आहे.
माझिरे हे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. माझिरे हे मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांचे कट्टर समर्थक होते. काही दिवसांपूर्वी त्यांची मनसेमधून (MNS) हकालपट्टी करण्यात आली होती.
त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) या पक्षात प्रवेश केला होता. या प्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.