आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय, शिंदे-फडणवीस सरकारने काय ठरवलं? वाचा...

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय, शिंदे-फडणवीस सरकारने काय ठरवलं? वाचा...

मुंबई | Mumbai

आज (४ ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय

- शिधापत्रिकाधारकांना मिळणार शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज. 1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजेच 7 कोटी लोकांना प्रत्यक्ष लाभ. रवा, चणाडाळ, साखर व तेल (प्रत्येकी एक किलो पॅकेज) केवळ शंभर रुपयांत देणार - (अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग)

- आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमणार - (मदत व पुनर्वसन विभाग)

- पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देणार - (गृह विभाग)

- नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास गती मिळणार. सुधारित खर्चास मान्यता - (नगर विकास विभाग)

- भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देणार. योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता - (जलसंपदा विभाग)

- उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देणार. खर्चास सुधारित मान्यता. 8 दुष्काळी तालुक्यांना फायदा - (जलसंपदा विभाग)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com