शिक्रापूर येथे भीषण अपघात पाच ठार

शिक्रापूर येथे भीषण अपघात पाच ठार

पुणे |प्रतिनिधी| Pune

पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर जवळील २४ वा मैल येथे रविवारी संध्याकाळी ३ वाहनांमध्ये हा विचित्र आणि भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २ जणांची प्रकृती गंभीर आहे. पाचजण जखमी झाले आहे. ट्रक, दुचाकी आणि चारचाकी कारमध्ये हा विचित्र अपघात घडला.एक भरधाव वेगातील ट्रकने दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या एका कारला आणि दोन गाड्यांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे अशी- स्वप्नील पंडीत केंदळे (वय २४ रा. कांदीवली मुंबई), लिना राजु निकसे, तेजस राजु निकसे (वय २३ वर्शे रा.दांडेकर पुलाजवळ पुणे), विठठल पोपट हिंगाडे (वय ३८ ), रेष्मा विठठल हिंगाडे (वय ३५ ) दोन्ही रा. वासुंदे ता.पारनेर जि.अ.नगर

जखमींची नावे अशी - सिध्दार्थ संजय केंदळे (१८) रा. धायरी ता. हवेली जि.पुणे, आशा राजु निकसे, राजु सिताराम निकसे, रोहन उत्तम बारवेकर रा. न्हावरे ता. शिरूर, जि.पुणे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात शिक्रापूरजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला. पुणे शहरापासून ४५ किलोमीटर अंतरावर हा अपघात उघडला. शिक्रापूर पोलीस स्थानकातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. शिक्रापूरपासून सहा किलोमीटरवर हा अपघात झाला. रस्त्याच्या मधील दुभाजक तोडून ट्रक बाजूच्या मार्गिकेमध्ये घुसला आणि त्याने समोरुन येणाऱ्या गाड्यांना धडक दिली.

दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूला गेलेल्या ट्रकने आधी समोरुन येणाऱ्या एका एमयुव्हीला धडक दिली. या गाडीमध्ये सहा प्रवासी होते. त्यानंतर या ट्रकने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातामध्ये गाडीमधील तीन जण गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघांवर उपचार सुरु आहे. दुचाकीवरील जोडप्याचाही मृत्यू झालाय. दरम्यान ट्रकने ज्या गाडीला धडक दिली तिला मागून दुसऱ्या एका दुचाकीनेही धडक दिल्याने त्यावरील दोघेही जखमी झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com