NCP News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार-अजित पवार एकाच व्यासपीठावर; कार्यक्रमात काय बोलणार?

NCP News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार-अजित पवार एकाच व्यासपीठावर; कार्यक्रमात काय बोलणार?

पुणे | Pune

काही महिन्यांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह बडे नेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. या फुटीनंतर पुणे जिल्ह्यातील (Pune District) दौंड तालुक्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...

NCP News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार-अजित पवार एकाच व्यासपीठावर; कार्यक्रमात काय बोलणार?
मुंबई पोलीस ड्रग्ज माफिया ललित पाटीलला घेऊन नाशकात; कारखान्याच्या ठिकाणी केली चौकशी

याबाबत अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठानच्या 'अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल'च्या नवीन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला पवार कुटुंबीयातील हे सदस्य एकत्र आले आहेत. शरद पवार (Sharad Pawar)आणि अजित पवार हे आज ज्या कार्यक्रमासाठी एकत्र आले आहेत त्या व्यासपीठावर कोण कुठे बसणार याबाबत खुर्च्यांना नावांच्या पट्ट्या चिकटवण्यात आल्या आहेत.

त्यानुसार शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावाची खुर्ची पवार काका-पुतण्याच्या मध्ये ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमात पवार काका-पुतणे शेजारी शेजारी बसतील असे वाटत होते. व्यासपीठावर बसून ते एकमेकांशी बोलतात का? याची उत्सुकता होती. मात्र, या दोघांच्यामध्ये आता प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांची खुर्ची ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.

NCP News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार-अजित पवार एकाच व्यासपीठावर; कार्यक्रमात काय बोलणार?
Nashik Yeola Crime News : येवल्यात तीन ठिकाणी दरोडा, अनेकांना मारहाण करत लुटले लाखो रुपये

दरम्यान, राष्ट्रवादीत (NCP) पडलेल्या फुटीनंतर काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही, असे म्हणत टीका केली होती. त्याआधी देखील अनेकदा दोघांनी एकमेकांवर अप्रत्यक्षरित्या टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता हे दोघेही एकाच व्यासपीठावर भाषण करणार आहेत. यावेळी ते काय बोलणार? एकमेकांवर टीका करणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

NCP News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार-अजित पवार एकाच व्यासपीठावर; कार्यक्रमात काय बोलणार?
शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी - श्रीराम शेटे
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com