शनिवार वाड्याच्या प्रांगणात असलेल्या दर्ग्यावरुन वाद पेटण्याची शक्यता

शनिवार वाड्याच्या प्रांगणात असलेल्या दर्ग्यावरुन वाद पेटण्याची शक्यता

पुणे |प्रतिनिधी|Pune

शनिवार वाड्याच्या प्रांगणात असलेल्या दर्ग्यावरुन वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असल्याने पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शनिवार वाड्याच्या प्रांगणात असलेला हा दर्गा हटवावा अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे. दरम्यान, या दर्ग्यावरुन वाद पेटण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

शनिवार वाडा ही पुरातन वास्तू आहे. राज्याच्या इतिहासाची साक्ष हा वाडा देतो. या वाड्याला अनेक पर्यटक रोज भेत देतात. हा वाडा पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येतो. दर्गा परीसारात मुस्लिम दर्गा असण्याचा कुठलाही उल्लेख नाही. हा दर्गा नवीन असून याचे बांधकाम हे साधारण ३० वर्षांपूर्वी असल्याचा दावा हिंदू महासभेने केला आहे. या दर्ग्यामुळे वाड्याची सुरक्षितता तसेच हिंदवी साम्राज्यच्या वास्तूचे महत्व कमी होत आहे. हा वाडा पुरातत्व खात्याच्या अधिकार अंतर्गत येतो. दरम्यानच्या काळात त्यांनी अशा बांधकामाला परवानगी दिली असेल याची शक्त्यात नाही. त्यामुळे हा दर्गा पाडण्यात यावा असे देखील हिंदू महासभा आणि ब्राह्मण महासभेने म्हटले आहे. याबाबतचे निवेदन हे पुरातत्व खात्याला दिले आहेत.

शनिवार वाडा येथे मुख्य दरवाज्याच्या बाजूला असलेल्या झाडाखाली हा दर्गा आहे. यावर मुस्लिम भाविक चादर चढवत असतात. या दर्ग्याला सुरक्षा कठडे देखील बसवण्यात आले आहे.

दरम्यान, सदर वाडा हा पुरातत्व खात्याच्या अधिकार अंतर्गत येत असल्याने ते असा कोणत्याही बांधकामाला परवानगी देतील किंवा देऊ शकतील अशी शक्यता नाही. यामुळे हा दर्गा सदृश छोटं बांधकाम पाडून टाकावे भविष्यात इथे सुद्धा अतिक्रमण होऊन वाड्याच्या सुरक्षिततेला आणि सौंदर्यला बाधा येऊ शकते आणि हिंदवी साम्राज्यच्या वास्तूचे महत्वसुद्धा कमी होऊ शकते, अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com