'या' शहरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

'या' शहरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे |प्रतिनिधी| Pune

लोणावळ्यात सेक्स रॅकेटचा (Sex Racket) ग्रामीण पोलिसांनी (Police) पर्दाफाश केला आहे. त्यांनी एका पुरुषाला या प्रकरणात अटक (Arrested) केली आहे. ही व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp) माध्यमातून आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचत होती. दिल्ली (Delhi) आणि छत्तीसगढवरुन (Chhattisgarh) आणण्यात आलेल्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धनंजय कटवारू राजभर असे आरोपीचे नाव असून तो मुंबईतील चेंबूर (Chembur) भागातला रहिवासी आहे.

पोलिसांना अशी माहिती मिळाली होती की, लोणावळा आणि परिसरातून एक व्यक्ती काही महिलांचे फोटो आपल्या ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवतो. शुक्रवारी मध्यरात्री सुरू केलेली ही कारवाई शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती. पोलिसांनी बनावट ग्राहक बनून या व्यक्तीशी व्हॉट्सअ‍ॅपवरुन संपर्क केला.

आरोपीने त्यानंतर सांगितले की तो लोणावळ्यातील (Lonawala) वर्सोली भागात महिला उपलब्ध करुन देऊ शकतो. पोलिसांनी त्यानंतर त्या भागात जाऊन थोडी वाट पाहिली आणि त्यानंतर त्यांना एक गाडी त्यांच्या दिशेने येताना दिसली. गाडीतील व्यक्तींच्या प्राथमिक तपासणीनंतर पोलिसांनी (Police) राजभर आणि दोन महिलांना ताब्यात घेतले. पोलिसांनी जभरला अटक केली असून दोन महिलांना ताब्यात घेतल्याची माहिती लोणावळा पोलिसांनी दिली.

Related Stories

No stories found.