विरार आग दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना ७ लाखांची मदत जाहीर

राज्याकडून ५ तर केंद्राकडून २ लाखांची मदत
विरार आग दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना ७ लाखांची मदत जाहीर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । Mumbai

मुंबईतील विरारच्या दुर्घटनेतील मृताच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान कार्यालयातून मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना एकूण ७ लाखांची मदत जाहीर झाली आहे.

Title Name
नाशिकनंतर दुसरी मोठी दुर्घटना : विरार रुग्णालयास आग: १३ जणांचा मृत्यू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मृताच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तर PMNRF कडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाखांची मदत तर गंभीररित्या जखमींच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान ही दुर्घटना काल रात्री साडेतीन च्या सुमारास घडली आहे. काया आगीत १३ जण होरपळून मृत्यूमुखी पडल्याने देशभरातून या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आज सकाळी पालघरचे पालकमंत्री दादा भुसे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची पाहणी केली आहे.

या दुर्घटनेमध्ये जबाबदार असणार्‍यांना कडक शासन केले जाईल असे सांगताना या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे देखील आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com