महाराष्ट्र क्रिकेट संघात नाशिकच्या खेळाडूंची निवड

महाराष्ट्र क्रिकेट संघात नाशिकच्या खेळाडूंची निवड

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या ( Nashik ) साक्षी कानडी ( Sakshi Kanadi ) , ईश्वरी सावकार ( Ishwari Savkar ) व रसिका शिंदे (Rasika Shinde )  ह्या तीन खेळाडूंची महाराष्ट्रातर्फे एकोणीस वर्षांखालील महिला क्रिकेट संघात (Women's cricket Team) निवड झाली आहे. साक्षी कानडीने मागील हंगामात पुदुचेरी येथे खेळविण्यात आलेल्या टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातर्फे तेवीस वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे देखील प्रतिनिधित्व केले होते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे 19 वर्षांखालील महिलांसाठी 50 षटकांची एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्या स्पर्धेसाठी ह्या नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या तीन खेळाडुंची निवड झाली आहे. स्पर्धेपुर्वी पुणे येथे गोवा महिला संघसोबत सराव सामने खेळविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र संघाचा समावेश एलिट डी गटात असुन सदर महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेचे साखळी सामने 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2021 दरम्यान सुरत येथे खेळविले जाणार आहेत . महाराष्ट्राचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत : सौराष्ट्र – 28 सप्टेंबर, राजस्थान – 29 सप्टेंबर , उत्तराखंड – 1 ऑक्टोबर, आंध्र – 2 ऑक्टोबर, चंदिगड – 4 ऑक्टोबर .

तिघींच्या ह्या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व संघात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या तीनही युवा महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com