BARC Scientist Suicide : भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या, राहत्या घरी आढळला मृतदेह

BARC Scientist Suicide : भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या, राहत्या घरी आढळला मृतदेह

मुंबई | Mumbai

चांद्रयान -3 (Chandrayaan-3) मोहिमेच्या यशाबद्दल संपूर्ण देश शास्त्रज्ञांचे कौतुक करत आहे. तर इकडे मुंबईत (Mumbai) एका शास्त्रज्ञाने टोकाचे पाऊल उचलले आहे.

भाभा अणुसंशोधन केंद्रातील (Bhabha Atomic Research Centre) एका शास्त्रज्ञाने आत्महत्या (Scientist Dies By Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. मनिष सोमनाथ शर्मा असं मृत शास्त्रज्ञाचं नाव आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी ही माहिती दिली आहे. या शास्त्रज्ञानी घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष यांनी सोमवारी दुपारी ३ च्या दरम्यान आत्महत्या केली. पत्नीनं शेजारी राहणाऱ्यांच्या मदतीनं मनीष शर्मा यांना BARC रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं? याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.

पोलिसांनी सांगितलं की, शास्त्रज्ञ मनीष शर्मा यांच्या घरातून एक सुसाईड नोट मिळाली आहे. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी एडीआर नोंदवला आहे. शर्मा मानसिक तणावाखाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com