राज्यातील ‘या’ भागात शाळा होणार सुरू
संग्रहित

राज्यातील ‘या’ भागात शाळा होणार सुरू

करोना नियमांचे पालन करावे लागणार

मुंबई / Mumbai - राज्यातील करोना (coronavirus) परिस्थिती सुधारत आहे. दरम्यान, करोनाकाळात बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. करोनामुक्त भागात आठवी ते बारावीपर्यंतचे शाळा/महाविद्यालये (schools/colleges) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबतचे सर्वाधिकार हे ग्रामपंचायतींना देण्यात आलेे आहेत.

दरम्यान, या शाळा सुरू झाल्यावर शाळांमध्ये कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे. शाळांमध्ये एका बेंचवर केवळ एका विद्यार्थ्याला बसण्याची परवानगी असेल. तसेच दोन बेंचमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवले जाईल. तसेच विद्यार्थ्यांना करोनाविषयक नियमांचे पालन करावे लागणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com