<p>मुंबई | Mumbai</p><p>CBSE ने दहावी व बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दरम्यान, दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा करोनामुळे लाबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे.</p>.<p>गायकवाड यांनी म्हंटले आहे की, "यंदा इयत्ता 12वी ची परीक्षा 15 एप्रिलनंतर आणि इयत्ता 10वी ची परीक्षा ही येत्या 1 मे नंतर घेण्याच्या विचार करीत आहोत. आरोग्य अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून इयत्ता पाचवी ते आठवीसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करीत आहोत. लवकरच निर्णय घेऊ.''</p>.<p>करोनामुळे यंदा शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. तर मुंबई आणि परिसर वगळता राज्यातील इतर भागात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या तरी विद्यार्थी आणि पालकांचे परीक्षा कधी होणार याकडे लक्ष लागले होते. </p>