एसबीओए शाळा बनले तात्पुरते कारागृह

एसबीओए शाळा बनले तात्पुरते कारागृह

करोना संसर्ग थोपवण्यासाठी प्रयत्न

औरंगाबाद - Aurangabad :

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नव्याने आलेल्या कैद्यांमुळे जेलमधील इतर कैदी अथवा कर्मचारी यांना करोनाची लागण होऊ नये म्हणून तात्पुरते कारागृह उभारणीसाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी एसबीओए शाळेला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी तेथील मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचार्‍यांशी संवाद साधून जिल्हाधिकारी यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका माने यांनी जिल्हाधिकारी यांचे आभार मानले.

हर्सूल कारागृहामध्ये सध्या 1400 च्या जवळपास कैदी तर 215 कर्मचारी आहेत. एसबीओए शाळेतील 4 खोल्या या पुरुष कैद्यांसाठी तर 1 खोली ही महिला कैद्यांसाठी देण्यात येणार आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी रोडगे, आर. आर भोसले (प्र. अधिक्षक), गिरी (पोलीस निरीक्षक), नायब तहसीलदार सलोक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com