शाळांबाबतचा निर्णय कधी?; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले, वाचा…

शाळांबाबतचा निर्णय कधी?; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले, वाचा…

पुणे | Pune

जिल्ह्यात कोवीड प्रतिबंधक लसीकरणाचा (Corona Vaccinations) ७० लाखांचा टप्पा पार झाला आहे. ग्रामीण भागात धडक सर्वेक्षण मोहिमेंतर्गत २ लाख ८३ हजार ३२७ नमुना तपासणी करण्यात आली आहे.

शाळांबाबतचा निर्णय कधी?; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले, वाचा…
Video : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा आत्महत्येचा इशारा..; आमदार लंकेंकडे बोट?

ग्रामीण कार्यक्षेत्रातील हॉटस्पॉट (COVID19 Hotspot) गावांमध्ये कोविड योग्य वर्तन जनजागृती, शोध चाचणी उपचार, कोविड केअर सेंटर (COVID care center), शासकीय योजना व कोविड लसीकरण या पाच कृतीदलाच्या माध्यमातून कोविडमुक्त गाव अभियानास सुरुवात करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकंमत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिली, तसेच टास्क फोर्सच्या (Corona Task Force) मार्गदर्शनानुसारच शाळा सूरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे (Pune) विधान भवनाच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील करोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जि.प.अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार सुनील शेळके, आमदार सुनिल टिंगरे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ.सुभाष साळुंखे आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यात मागील चार आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी प्रशासन तयारी करत असून नागरिकांनीही नियमांचे पालन करावे. पुणे मनपामध्ये १०, पिंपरी चिंचवडमध्ये ३, पुणे ग्रामीण मध्ये १२ ऑक्सिजन प्लँट (Oxygen Plant) कार्यान्वीत झाले आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने अपेक्षीत ऑक्सिजनची गरज लक्षात घेता जिल्हा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण करण्यात येत आहे.

जिल्ह्यात पहिल्या डोस आधी दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यात लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे. जवळपास कोवीड लसीकरणाचा ७० लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. जास्तीत जास्त लस उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सूरु आहेत. खाजगी रुग्णालय लसीकरणावरही शासनाचे नियंत्रण आहे. तसेच खाजगी रुग्णालयाच्या वैद्यकीय देयकांचे लेखा परिक्षणही वेळोवेळी सुरु आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी चाचण्यांचे प्रमाण कमी केलेले नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com