शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोना; अधिवेशनात होत्या उपस्थित

अनेक मंत्री, आमदार गायकवाड यांच्या संपर्कात आल्याची माहिती
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोना; अधिवेशनात होत्या उपस्थित
वर्षा गायकवाड

मुंबई | Mumbai

राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना करोनाची (covid19) लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांनी ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड काल (सोमवारी) अधिवेशनात उपस्थित होत्या.

वर्षा गायकवाड
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

काल सायंकाळी लक्षणं जाणवल्याने चाचणी केली असता करोनाचा संसर्ग झाल्याचं कळालं. मला सौम्य लक्षणं आहेत. सध्या प्रकृती चांगली असून, स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

वर्षा गायकवाड
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

दरम्यान वर्षा गायकवाड यांना करोनाच्या पहिल्या लाटेतही संसर्ग झाला होता. सप्टेंबर २०२० मध्ये वर्षा गायकवाड करोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. संसर्ग झाल्यानंतर त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालायात दाखल करण्यात आलं होतं.

विधिमंडळ अधिवेशनादरम्यान अनेकांना करोना संसर्ग झाल्याचं समोर येत आहे. सोमवारी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना देखील करोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आत्तापर्यंत ३५ जणांचा करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

वर्षा गायकवाड
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

अधिवेशन सुरु झाल्यापासून २ हजार ३०० जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३५ जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

वर्षा गायकवाड
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

Related Stories

No stories found.